भाविक पदयात्रेने वणीगडासाठी रवाना – शहरातून काढली भव्य मिरवणूक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील तरुण कुढापा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक जिल्ह्यातील वणीगड येथे मोठ्या उत्साहामध्ये भाविकांची पदयात्रा निघाली आहे.

गुरुवार, दि. ७ एप्रिल रोजी शहरातून भाविकांची मिरवणूक काढून त्यांना पदयात्रेसाठी सदिच्छा देण्यात आल्या. तरुण कुढापा मंडळातर्फे दरवर्षी शेकडो भाविक पदयात्रा करून नाशिक जिल्ह्यातील वणीगड येथे जात असतात. यंदाचे त्यांचे अठरावे वर्ष आहे. मंगळवारी रात्री भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या श्रद्धेने भजनी मंडळ यांचे कार्यक्रम झाले. यावेळी महापौर जयश्री महाजन, सामाजिक कार्यकर्त्या सरिता माळी कोल्हे उपस्थित होत्या.

गुरुवारी ७ एप्रिल रोजी तरुण कुढापा चौकातून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. प्रथम देवीची महाआरती झाली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत भाविकांच्या जल्लोषामध्ये ही मिरवणूक निघाली. ही मिरवणूक रथ चौक, नेताजी सुभाष चौक, टावर चौक, शिवतीर्थ चौक, गणेश कॉलनी चौक अशी निघाली. पुढे भाविक पायी यात्रेला नाशिकच्या दिशेने निघाले. पदयात्रेत महिलांचादेखील समावेश आहे.

पदयात्रेसाठी महापौर जयश्री महाजन, माजी महापौर ललित कोल्हे यांचे सहकार्य लाभले. पदयात्रेसाठी अध्यक्ष पंकज भावसार, उपाध्यक्ष सुमित सपकाळे, कार्याध्यक्ष शंभू भावसार, नारायण कोळी, आबा चौधरी, पवन भावसार, संदीप चौधरी, भूषण पाटील आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.

Protected Content