५० तरुण कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीच्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्ताने ५० तरुण कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

माजी मंत्री तथा विद्यमान आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जुन्या जळगांवातील वीर जवान गृपचे संस्थापक अध्यक्ष राहुल पाटील यांच्यासोबत ५० तरुण कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

यावेळी जळगांव शहराचे आमदार राजुमामा भोळे, दिपक सुर्यवंशी, आरोग्यदूत अरविंद देशमुख, युवा मोर्चा सरचिटणीस जितेंद्र चौथे, मिलिंद चौधरी, भूषण भोळे व इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content