लोणी सीम येथे आदिवासी सुरक्षा रक्षक संघटनेची बैठक

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील लोणी सीम येथे आदिवासी भिल्ल समाजाची बैठक उत्साहात पार पडली.

या मिटिंगला अनिल मोरे यांनी मार्गदर्शन केले. यात त्यांनी आदिवासींवर होणारा अन्याय, अत्याचार, आदिवासिंचे होणारे शोषण, आदिवासींच्या विरोधात होणारे कायदे व धोरण तसेच आदिवासीचा धर्म, भिल्ल समाजातील अज्ञानपणा व अशिक्षितपणा मुळे समाजात येण्यार्‍या अडचणी, अशा अनेक मुद्दयांवर समाजबांधवांना मार्गदर्शन केले. त्यानंतर येत्या ११एप्रिलला शिंदखेडा जिल्हा धुळे येथे होणार्‍या भिल्ल समाज प्रबोधन महासंमेलन २०२० या कार्यक्रमला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आग्रहाचे आमंत्रण अनिल मोरे यांनी उपस्थित समाज बांधवांना दिलेले आहे. आलेल्या सर्व समाज बांधवांनी पारोळा तालुक्यातील विखुरलेला व असंघटित समाजाला एकत्र करून यांना साथ देण्याचे आश्‍वासन दिले आहे.

याप्रसंगी लोणीसीमच्या तिन्ही गावांचे माजी सरपंच व त्यांचे सदस्य, ग्रामस्थ बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते, तसेच माजी जि. प. सदस्य दगडू पवार, सुनिल पिंपळे, मालेगाव, अरुण पवार, मनमाड, मुन्ना गोधडे मनमाड, रवींद्र वाघ, धाबे पारोळा, शिवा सोनवणे, रामचंद्र मोरे, लोणीसीम, बाळूभाऊ मालचे आदी सर्व मान्यवर या मिटिंग साठी उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार आणि स्वागत आदिवासी सुरक्षा रक्षक समितीचे तालूका अध्यक्ष रवींद्र वाघ व रामचंद्र मोरे यांनी केले.

Protected Content