शेगावचा रामनवमी उत्सव स्थगित

खामगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमिवर श्री क्षेत्र शेगाव येथे अत्यंत महत्वाच्या अशा श्रीरामनवमी उत्सवाला स्थगित करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

२८ मार्च पासून या उत्सवाला सुरू होणार होती. मात्र, केंद्र व राज्य सरकारांचे निर्देश पाहता शेगाव संस्थाननेही हा उत्सव स्थगित करावा या मुद्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी राजाराम पुरी, शेगाव संस्थानचे प्रशांत पुरी यांच्यासह बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा उत्सव स्थगित करण्याबाबत चर्चा झाली. त्यास संस्थांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. याबाबत लवकरच औपचारीक घोषणाही होण्याची शक्यता आहे.

शेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थांनचा हा रामनवमी उत्सव वर्षातील एक मोठ्या उत्सवापैकी एक आहे. याला मुंबई, पुण्यासह राज्य व देशातील कानाकोपर्‍यातून भाविकांची हजेरी असते. त्या पार्श्‍वभूमीवर कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची शक्यता पाहता तो स्थगित करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी दिले आहेत.

Protected Content