उपोषणकर्ते शिक्षकांवर लाठीमारप्रकरणी धरणगावात शिक्षक संघटनांतर्फे निषेध

dharangav 1

धरणगाव प्रतिनिधी । विना अनुदानीत तत्वावर काम करण्या-या शिक्षकांचे मुंबई येथे उपोषण सुरु असतांना झालेल्या लाठीमारबाबत धरणगाव तालुकातील माध्यमिक शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ, टीडीएफ व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्यावतीने आज तहसील कार्यालयासमोर तीव्रनिषेध व्यक्त करत मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या १५ वर्षांपासून राज्यातील अनेक शिक्षक विनाअनुदान तत्वावर व वाढीव तुकड्यावर बिना वेतन काम करीत असून त्यांना संसार करणे, पोराबाळांचे उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. काही शिक्षकांनी आत्महत्या करुन देखील सरकार त्यांच्याकडे हेतूपुरस्कर दुर्लक्ष करीत आहे. राज्यातील विनाअनुदान तत्वावर व वाढीव तुकड्यावर काम करणा-या शिक्षकांनी अनुदान मिळण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरु केले आहे. दि. २६ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर शिक्षक बंधू सनदशीर व शांतपणे आंदोलन करीत असतांना पोलिसांनी त्यांच्यावर केलेल्या अमानुष लाठीमाराचा आम्ही शिक्षक या नात्याने सरकारचा जाहिर निषेध करीत आहोत. प्रगतीशील महाराष्ट्रातील सरकार शिक्षकांना मारहाण करते. हीबाब लाजीरवाणी आणि निंदनीय असून या घटनेचा निषेध करत असल्याचे नमुद करण्यात आले आहे.

याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे प्रा.बी.एन.चौधरी, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सी.के.पाटील, टीडीएफ चे जिल्हा कॉन्सील सदस्य शरदकुमार बन्सी, टीडीएफ अध्यक्ष डी.एस.पाटील, पर्यवेक्षक डॉ. संजीवकुमार सोनवणे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.एस.पाटील, टीडीएफचे उपाध्यक्ष पी.डी.पाटील, पी.आर.चे आर.के.सपकाळे, डॉ.वैशाली गालापूरे, वंदना डहाळे, सुरेखा तावडे, कैलास वाघ, एन.आर.सपकाळे, इंदिरा गाधी विद्यालयाचे डी.एन.पाटील, राजेंद्र पाटील, म.फुलेचे सुनिल कोळी, एस.व्ही.आढावे, हेमंत माळी, चंद्रकांत भोळे, आदर्श विद्यालयाचे किरण चव्हाण, अॅग्लो उर्दूचे शकील शेख, एस.पी.सोनार, एस.के.बेलदार, जी.आर.
सीर्यवंशी, आर.जी.खैरे, योगेश नाईक, मिलींद हिंगोणेकर, जितेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते. सुञसंचालन शरदकुमार बन्सी यांनी तर आभार डी.एस.पाटील यांनी मानले. या घटनेचा तालुक्यातील शाळांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला.

Protected Content