यावल येथे आमरण उपोषण बेकायदेशीर; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडीओ)

जळगाव सचिन गोसावी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ वसतीगृहात पाणी पुरवठ्यात कोणताही भ्रष्टाचार झालेला नसून अकासापोटी यावल येथील एकात्मिक आदीवासी प्रकल्प विभागासामोर होत असलेले उपोषण हे बेकायदेशीर असून संबंधित उपोषणकर्त्यावर कारवाई करण्याची मागणी विद्यापीठातील आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहप्रमुख बी.टी.पाटील यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदनव्दारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शासकीय आदिवासी वसतीगृहात होणारा पाणी पुरवठा हा टँकरद्वारे केला जात आहे. विद्यापीठाच्या आवारात तीन बोअरवेल आहेत. परंतू एकाच बोअरवेलला पाणी कमी आहेत. दरम्यान विद्यापीठाच्या शासकीय वसतीगृहात पाणी पुरवठा सुरू होण्यासाठी विहित कालावधीसाठी यावल येथील एकात्मिक आदीवासी प्रकल्प विभागाने विद्यापीठाच्या कार्यालयास आदेशीत केले होते. त्यानुसार विद्यापीठातील प्रशासकीय विभागाने विद्यार्थ्यांच्या सोयी व सुविधासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात आली आणि दरपत्रक मागविण्यात आले. दरपत्रकाची छाननी करून सर्वात कमी दरपत्रक असणाऱ्या पुरवठादारास टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा ठेका देण्यात आला. आणि नियमानुसार त्याला देयके अदा करण्यात आली आहे. तेव्हापासून आतापर्यंत पाण्यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. 

मात्र करण हरदास सोनवणे रा. अशाबाबा नगर यांना नियमाप्रमाणे कामाचा ठेका मिळाला नसल्यामुळे त्यांनी वेळोवेळी आंदोलन आणि विद्यापीठाच्या प्रशासनाला वेठीस धरून जेवनाचा ठेका मिळविला. त्यातही समाधान न मिळाल्याने आकसापोटी सिध्दार्थ वसतीगृहात पिण्याचे पाणी जार पुरवठा मिळण्यासाठी आंदोलन केले त्यावेळी देखील करण सोनवणे यांना पाण्याचे जार पुरवठ्याचा ठेका देण्यात आला.  सिध्दार्थ वसतीगृहात वाटर प्लॉट आल्याने जार पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर करण सोनवणे याने आपला मोर्चा टँकर पाणीपुरवठ्याकडे वळविला. माहिती अधिकाराचा गैरवापर करून संघटनेमार्फत कार्यालयास व प्रशासनास वेठीस धरलेले  आहे. यासाठी गेल्या चार दिवसांपासून यावल येथील एकात्मिक आदीवासी प्रकल्प विभागासमोर आमरण उपोषणला सुरूवात केली. हे उपोषण बेकायदेशीर असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी विद्यापिठातील आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहप्रमुख बी.टी.पाटील यांनी आज मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेवून मागणीचे निवेदन दिले आहे.

https://www.facebook.com/508992935887325/videos/1536036930072632

 

Protected Content