आर. अश्विनची कारकीर्द धोक्यात

ravichandran ashwin

मुंबई प्रतिनिधी । वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या संघात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला संधी देण्यात आली नाही. तसेच अश्विनचे कर्णधारपद ही काढून घेण्यात असून त्याला संघातूनह डच्चू देण्यात असल्याचे वृत्त समोर येत आहेत.

याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अश्विन हा किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार आहे. पण त्याचे पंजाबच्या संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात असून त्याला संघातूनही डच्चू देण्यात असल्याचे माहिती मिळत आहे. अश्विनच्या नेतृत्वाखाली पंजाबला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. तसेच यावर पंजाबच्या संघाची एक बैठक या आठवड्याच्या शेवटी होणार आहे. या बैठकीमध्ये अश्विनला संघात न ठेवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो, असे म्हटले जात आहे. अश्विनला संघातून काढल्यावर आता संघाचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे, या गोष्टीचा चर्चा या बैठकीमध्ये होणार असल्याचे समजते आहे. सध्याच्या घडीला अश्विन हा भारताच्या ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय संघात नाही. अश्विन हा फक्त भारताच्या कसोटी संघात आहे. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे आता भारताच्या संघात अश्विन दिसणार की नाही, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

Protected Content