मोठी बातमी! विरोधी पक्षनेते पदाची धुरा काँग्रेसकडे

मुंबई – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज वृत्तसेवा | राज्याचे विरोधी पक्षनेते पधाचा पेच अखेर सुटला असून हे पद कॉग्रेसकडे गेले आहे. त्यानुसार विजय वडेट्टीवार यांच्याकडे हि जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

याबाबत विधान परिषदेतील आमदार सत्यजित तांबे यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या सहकाऱ्यांसह सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त होते. या जागेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही दावा करण्यात येत होता. विधानसभेत ज्याचे सर्वाधिक सदस्य त्याचा विरोधी पक्षनेता असं सूत्र आहे. त्यानुसार, महाविकास आघाडीत आता सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे असल्याने विरोधी पक्षनेते पदही काँग्रेसला देण्यात आले आहे. विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेता असतील असा काँग्रेसने निर्णय घेतला आहे.

दरम्यान याबाबत काँग्रेसकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

Protected Content