दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी केंद्राकडून परवानगी

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनामुळे सातत्याने तीन वेळा लॉकडाउन वाढवण्यात आल्याने अनेक राज्यातील बोर्डाच्या परीक्षांसह सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतू राज्यांच्या मागणीनंतर केंद्राने दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी परवानगी दिली आहे.

 

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी तसे पत्र राज्यांच्या सचिवांना पाठवले असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याविषयी माहिती दिली.यानुसार राज्य शैक्षणिक मंडळ, सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांना परीक्षा घेण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्य लक्षात घेऊन लॉकडाउनच्या काळात परीक्षा घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्यांना आणि इतर बोर्डांना दहावी बारावीच्या परीक्षा घेता येणार असून, सोशल डिस्टसिंगसह काही बाबींचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही शाह म्हणाले. परंतू कंटेनमेंट झोनमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यास केंद्राने स्पष्ट नकार दिला आहे.

Protected Content