जळगाव जिल्ह्यात आज तेरा कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील मुक्ताईनगर, कासोदा एरंडोल, जळगाव, चोपडा, भडगाव, पाचोरा, यावल आदि विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 88 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 75 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून तेरा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भडगाव येथील आठ, चोपडा येथील एक, यावल येथील एक तर जळगावातील शिवाजीनगर व इतर परिसरातील तीन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 331 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 110 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे तर आतापर्यंत 37 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रकोप हा जिल्ह्यात विविध ठिकाणी पसरत असल्याचे दिसुन आले आहे. आजच्या रिपोर्टमधून भडगाव तालुक्यातील रूग्णांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आधी अमळनेरात या विषाणूचा संसर्ग जास्त प्रमाणात दिसून आला असला तरी आता मात्र तेथील रूग्ण संख्या आटोक्यात आल्याचेही अधोरेखीत झाले आहे.

Protected Content