ऑक्सिजन निर्मिती प्लँट स्थापन करा : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

 

बुलडाणा,प्रतिनिधी ।  जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असतांना त्यांना ऑक्सिजन गरज लागल्यास तो बाहेरील जिल्ह्यातून आणावा लागतो, मात्र तेथून पुरवठा न झाल्यास रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत असल्याने जिल्ह्यातील रूग्णालयांनी ऑक्सिजन निर्मिती प्लँट स्थापन करावा  असे अन्न व औषध प्रशासन विभागाने आवाहन केले आहे.

 

सद्यस्थितीत कोरोना  या साथरोगाचे रूग्ण जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. या आजाराच्या उपचारासाठी तातडीचे प्रसंगी रूग्णांना ऑक्सिजन द्यावा लागतो. जिल्ह्यात मात्र एकही ऑक्सिजन उत्पादक नाही. त्यामुळे जिल्ह्याला आवश्यक असणारा मेडीकल ऑक्सीजन हा बाहेरील जिल्ह्यातून बोलवावा लागतो. बाहेरील जिल्ह्यातून पुरवठा न झाल्यास आपत्कालीन प्रसंगी ऑक्सीजन अभावी रूग्णाला जिवही गमवावा लागतो.  तरी जिल्ह्यातील नागरिक, उद्योजक, ऑक्सीजन लागत असेलली रूग्णालये यांनी पुढे येत ऑक्सीजन निर्मिती प्लॅन्ट उभारावे. जेणेकरून ऑक्सीजनअभावी रूग्णाला आपले प्राण गमवावे लागणार नाही.  जिल्ह्यात कुणी मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन निर्मिती करू इच्छीत असेल तर त्यांनी पुढे यावे अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे परवाना मिळण्यासाठी संपुर्ण मदत करण्यात येईल. जिल्ह्यातील रूग्णालयांनी याबाबत पुढे येत ऑक्सीजन निर्मिती प्लँट स्थापन करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Protected Content