प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार : आठवले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी तयार असल्याचे महत्वाचे विधान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आरपीआयमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. एका कार्यक्रमात आठवले म्हणाले की, महाराष्ट्रात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप असे चार मोठे पक्ष आणि मनसेही आहे. आपण एकत्र यायला पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांना माझे नम्र निवेदन आहे की समाजाच्या हितासाठी आपण एकत्र यायला पाहिजे. आपण पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारा, नेतृत्व घ्या मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे.

दरम्यान, आठवले पुढे म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाचे नाव मजबूत करण्यासाठी मी देशभर फिरतो आहे. कुणी वंचितचे नाव देते कोणी इतरांचे. पण मी कायम रिपब्लिकन राहणार असंही ते म्हणाले. रिपब्लिकन पक्षाला आपल्याला व्यापक बनवायचे आहे, सगळ्या जातीच्या लोकांना त्यात आणायचे आहे, बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजाला एकत्र आणण्याचा चांगला प्रयोग केला. पण लोकसभा, विधानसभेला एकही त्यांचा माणूस निवडून आले नाही. निवडून यायचं असेल तर माझ्याकडून शिका आणि पडायचे असेल तर त्यांच्याकडून, असा टोलाही त्यांनी लगावला. तर भोंगा प्रकरणावरून राज ठाकरे यांनी माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी केली. आपण बाळासाहेबांच्या तालमीत तयार झाला आहात वाद मिटवण्याचे काम करायला पाहिजे. अंगावर भगवा तुम्ही घातला तुमचा आदर आहे, पण वाद लावण्याचे काम करू नका, असंही ते म्हणाले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: