जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील रामदेववाडी येथील एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जितेंद्र ममतू राठोड (वय-२७) रा. रामदेव वाडी ता. जि.जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बांधकाम मिस्तरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १० मे रोजी सायंकाळी त्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीएक्स ६१७९) पार्क करून लावली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची १० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मिलींद सोनवणे करीत आहे.