कोरोनाचा कहर : इटलीमध्ये २४ तासात ३६८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसमुळे इटलीमध्ये अवघ्या २४ तासात ३६८ जणांचा मृत्यू झाला झाल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, जगभरात दीड लाखांहून अधिक लोकं कोरोनाग्रस्त आहेत.

 

इटलीत आतापर्यंत एकाच दिवसात झालेल्या मृत्यूची ही संख्या सर्वात जास्त आहे. यामुळे देशात या विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या १८०९ वर पोहोचली आहे. अधिकृत आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. इटालियन नागरी संरक्षण सेवेने माध्यमांना प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, संक्रमित व्यक्तींची संख्या २४ हजार ७४७ पर्यंत वाढली आहे. मिलानजवळील उत्तरी लोम्बार्डी प्रदेशात सर्वाधिक १२१८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जगभरात आतापर्यंत ६५१५ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Protected Content