आशा व गटप्रवर्तक यांचे विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । आशा व गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनतर्फे आज महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.

आशा व गटप्रवर्तक यांना कोरोना काळात नियमित  कर्मचाऱ्यांप्रमाणे राबवण्यात येते.  परंतु त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही उलट त्यांना अधिकारी टाकून सांडून बोलतात व धमक्या देत असतात.  सर्वेक्षणाला गेल्यावर त्यांच्यावर अनेकदा हल्ले झाले आहेत. कोरोनाकाळात सक्षम व समर्थपणे सेवा देणाऱ्या आघाडीच्या कामगारांना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले आहे.  ही अभिमानाची बाब असली तरी त्यांना  गरजेनुसार मोबदला दिला जात नाही.  अशा भयंकर महामारीत  काम करणाऱ्यांना प्राण सुद्धा गमवावे लागले त्याचे कुटुंब उघडे पडले व मुले पोरकी होण्याची वेळ त्यांच्यावर आली असली तरीही केंद्र व राज्य सरकार त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे.

आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्या :   

आशा व गटप्रवर्तक यांना  शासकीय सेवेत सामावून घ्या आशा व गटप्रवर्तक यांना किमान वेतन  दरमाह २२ हजार रुपये करा. सामाजिक सुरक्षा मेडिक्लेम योजना लागू करा. कोंविड लसीकरण ड्युटी आशांना बंधनकारक नसतांना ड्युटी लावण्यात येत आहे. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मानधनाची विशेष तरतूद करावी. आशांना कोणतेही तांत्रिक प्रशिक्षण दिले नसताना कोरोनाच्या टेस्टची ड्युटी लावण्यात येऊ नये. कोरोनाच्या कामासाठी आशा व गटप्रवर्तक यांना  प्रतिदिन ३००  रुपये मोबदला देण्यात यावा. आशांना सर्व थकीत मोबदला, स्टेशनरी त्वरित अदा करावी.  आशांना व गट प्रवर्तकांना त्यांच्या कामाव्यतिरिक्त इतर कामे करण्याची  सक्ती बंद करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला.  हा लाक्षणिक संप कॉ. विजय पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. याप्रसंगी शारदा कुटे, कविता बाविस्कर सिटूचे आशा महानगरप्रमुख कॉ. प्रवीण चौधरी आदी उपस्थित होते. 

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/780718542580604

 

Protected Content