मुक्ताईनगर येथे अज्ञात वाहनाने दोघांना चिरडले; नातेवाईकांचा आक्रोश

muktain nagar

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील राष्ट्रीय महामार्गावरील खडसे फार्महाऊस समोर उड्डाणपुलाच्या कामावर असलेल्या दोन तरूणांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने दोघे जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलीसात अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेल्या वर्षापासून सुरू आहे. दरम्यान ठिकठिकाणी उड्डाण पुलाचे काम व अंडर बायपासचे देखील काम सुरू आहे. याठिकाणी खासगी कंपनीच्या मार्फत सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहे. पवन संजय जयकर (वय-18) आणि ललित उर्फ छोटू आनंदा तायडे (वय-17) दोन्ही रा. संत रोहिदास नगर मुक्ताईनगर हे गेल्या सहा महिन्यांपासून सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहत आहे.

अज्ञात वाहनाने चिरडले
२४ रोजी मुक्ताईनगर मलकापूर रस्त्यावरील खडसे फार्म हाऊस जवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामावर या दोघा तरूणांची ड्यूटी होती. २४ रोजीच्या मध्यरात्री पवन व ललित हे दोघे ड्युटीवर असतांना अज्ञात वाहनांचे चाक दोघांच्या डोक्यावरुन गेल्याने दोघे जागीच ठार झाल्याची घटना घडली. २५ रोजी सकाळी अपघात झाल्याची घटना उघडकीस आल्याने नागरिकांनी एकच गर्दी केली.

मुक्ताईनगर पोलीसांची धाव
पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनेचे वृत्त कळताच आ. चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत चिडलेला जमावाला शांत केले. दोघे युवकांचे मृत देह उपजिल्हा रुग्णालयात पवन व ललित यांच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. याप्रकरणी दीपक जयकर यांचे फिर्यादीवरून पोलिसात अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप
तसेच उपजिल्हा रुग्णालयात जमलेल्या नातेवाईक व ग्रामस्थांनी दोघे युवकांचा घातपात झाल्याचा आरोप करीत प्रचंड आक्रोश केला. दोघ तरूणांचा भर तारुण्यात करून मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे यांनी देखील उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांना भेट दिली.

राष्ट्रीय महामार्गावर नातेवाईकांचा रास्ता रोको
सदर घटनेबद्दल नातेवाईकानी कंपनीचे व्यवस्थापक यांना संपर्क साधला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने व्यवस्थापक व ठेकेदार पोलीस स्टेशनला हजर होत नाही. शवविच्छेदन न करण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. यामुळे पोलीस स्टेशन नातेवाईक व ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केलेली होती. सर्व नातेवाईक व जमाव थेट हायवे चौफुलीवर मुक्ताई चौकात जात रास्ता रोको आंदोलन सुरू केले. प्रसंगी पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक निलेश सोळुंके, हवालदार संतोष नागरे यांनी नातेवाईकांना समज देवून आंदोलन स्थगित केले.

Protected Content