केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रमोशननंतर मिळणाऱ्या पगारवाढीचा संभ्रम दूर

paise

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रमोशन (बढती) मिळाल्यानंतर देण्यात येणाऱ्या पगारवाढीसंदर्भात कर्मचाऱ्यांमध्ये नुकताच संभ्रम निर्माण झाला होता. प्रमोशननंतर पगारवाढ मिळण्याच्या तारखेबद्दल प्रश्न उपस्थित केला जात होता. कर्मचाऱ्यांच्या मनात पडलेल्या प्रश्नाचे अखेर सरकारनेच उत्तर दिले आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला २ जानेवारी ते ३० जूनच्या दरम्यान प्रमोशन मिळाले असेल, तर त्या कर्मचाऱ्याला १ जानेवारीपासूनच वाढीव पगार मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

 

एखाद्या बढती मिळाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पगारवाढही दिली जाते. पगारवाढीसंदर्भात कर्मचाऱ्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण झाला. प्रमोशन मिळाल्यानंतर पगारवाढीसाठी कोणती तारीख ग्राह्य धरली जाणार ? यावरून गोंधळाचे वातावरण आहे. केंद्र सरकारने हा गोंधळ दूर केला असून, अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

खर्च विभागाच्या म्हणण्याप्रमाणे एखाद्या कर्मचाऱ्याला प्रमोशन ठरलेल्या तारखेच्या आधी वा नंतर मिळाले तर त्या कर्मचाऱ्याला सहा महिन्यांची सेवा पूर्ण झाल्यानंतरच पगारवाढ दिली जाणार आहे. मग त्या कर्मचाऱ्याला प्रमोशन १ जानेवारीला मिळो अथवा १ जुलै कोणती तारीख आधी येते त्यावर हे अवलंबून असणार आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याला प्रमोशन देताना अथवा पगारवाढीसंदर्भातील तारीख निवडण्यासंदर्भात दोन पर्याय दिले जातात. त्याच पर्यायांच्या आधारावर कर्मचाऱ्यांना लाभ दिले जातात.

असा झाला बदल :- पूर्वी कर्मचाऱ्यांना १०, २० आणि ३० वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर प्रमोशन दिले जात होते. मात्र, आता त्या नियमात बदल करण्यात आला असून, कामाचे मूल्यमापन करून प्रमोशन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता सरकारने पगारवाढीसंदर्भातील संभ्रम दूर केला असला तरी ५० लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. सरकारने फिटमेंट फॅक्टर वाढवून मूळ वेतन २६ हजार इतक ठेवावे, अशी मागणी केली जात आहे. सरकारने ही मागणी मान्य केली, तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात आठ हजारांची वाढ होणार आहे.

Protected Content