स्टेडीयम कॉम्प्लेक्स परिसरातून मोबाईल लांबविणाऱ्या दोघांना कुसुंबा येथून अटक

जळगाव –  लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम कॉम्प्लेक्स परिसरातून व्यापाऱ्याचा मोबाईलची चोरी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना कुसुंबा येथून गुरूवारी २४ फेब्रुवारी रोजी सकाळी अटक करण्यात आली आहे. दोघांवर जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, बळीराम पेठेतील व्यापारी गुरफान उस्मान शेख (वय-३३) हे सोमवारी १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कामानिमीत्त छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समध्ये आले. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कॉम्प्लेक्स मधील जम्बो झेरॉक्स दुकाना समोरुन अज्ञात चेारट्याने त्याच्या खिश्यातून २० हजारांचा मोबाईल अलगद चोरुन पोबारा केला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होतो. या गुन्ह्याचा तपास  तपास पेालिस नाईक सुभान तडवी करत आहेत.

 

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील मोरया कॉलनीतील रहिवासी गिरीष जगताप हा चोरीचा मोबाईल वापरत असल्याची गोपनिय माहिती पो नि किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसर हे.कॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, संदीप सावळे, पोलिस नाईक नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, राहुल पाटील, प्रितम पाटील, इश्वर पाटील आदींनी सापळा रचून तालुक्यातील कुसुंबा बस स्टॉप येथे जावून गिरीष जगताप यास ताब्यात घेतले. त्याने मोबाईल चोरीचा गुन्हा कबुल करत २० हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून दिला. या चोरीत त्याचा साथीदार सावंत संजय पाटील रा. कुसुंबा-जळगाव  हा देखील सहभागी असल्याचे त्याने कबुल केले. व त्याला अटक केली आहे. पुढील तपासकामी त्याला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content