कैद्यांच्या लसीकरणासाठी कारागृह अधिक्षकांचे तीन वेळा पत्र

जळगाव प्रतिनिधी ।  जळगाव जिल्हा करागृहात बंदी असलेल्या कैद्यांना कोवीशील्ड लस देण्यात यावी यासाठी कारागृह अधिक्षक अनिल वांढेकर यांनी तीन वेळा पत्र व्यवहार केला. परंतू तरी देखील वैद्यकीय महाविद्यालयाकडून लसीकरण केले जात नाही अशी माहिती कारागृह अधिक्षक वांढेकर यांनी आज सोमवारी सकाळी दिली आहे. 

जिल्हा कारागृहात २०० कैद्यांची क्षमता असून देखील ३७६ हून अधिक कैदी बंदी आहेत. त्यामुळे तेथे सोशल डिस्टन्सींगचे कोटेकोरपणे पालन होत नाही. अशात ४५ वर्षांवरील वयाचे अनेक कैदी आहेत. त्यांना लस देण्यात यावी यासाठी कारागृह प्रशासनाने आत्तापर्यंत तीन वेळा वैद्यकीय महाविद्यालयास पत्र दिले आहे. कारगृहातील कैद्यांच्या गर्दीमुळे काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याचे या पत्रात नमुद केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ४५ वर्षे वयाच्या पुढील सर्वांना लस देण्याचे कळवण्यात आले आहे. त्या अनुशंगाने कैद्यांना लसीकरण करण्यात यावे यासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील पथकाला पाठवून त्वरीत कैद्यांना लसीकरण करण्यात यावे असे पत्र कारागृह अधिक्षक अनिल वांढेकर यांनी दिले आहे.

Protected Content