विनापरवाना वृक्षतोड व वाहतूक करणाऱ्या एकाला अटक; यावल वनविभागाची कारवाई

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील कोरपावली शिवारातून बेकायदेशीररित्या वृक्षतोड करून त्यांची अवैधरित्या वाहतूक करतांना यावल वनविभागाच्या पथकाने ट्रक्टरचालकावर कारवाई केली आहे. यात ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वृक्षतोड करणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.

उपवनसंरक्षक जमीर शेख यावल वनविभाग जळगाव यांच्याकडून मिळालेल्या मिळालेल्या गुप्त बातमी व आदेशावरून मोहराळा ते कोरपावली या रस्त्यावर रविवार १७ मार्च रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान ट्रॅक्टरमधून लाकडांची वाहतूक करतांना पकडले. यावेळी ट्रॅक्टर चालकाकडे लाकूड वाहतूक करण्याचा परवाना नसल्याचे आढळून आले. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने ट्रॅक्टरसह चालकाला अटक केली. या कारवाईत अंजन, निम इमारती लाकूड आणि टॅक्टर क्टर क्रमांक (एमएच १९ बीजी ६२१०) जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी वाहन चालक खलील रफिक तडवी रा. कोरपावली ता. यावल अटक केली आहे. याप्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१, (२) ब, ४२, ५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
वनक्षेत्रपाल यावल पश्चीम व पथक तसेच् वनक्षेत्रपाल यावल पुर्व व पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व कॅम्पा यावल प्रथमेश हडपे यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल यावल पश्चिम सुनिल भिलावे, वनक्षेत्रपाल यावल पुर्व स्वप्नील फटांगरे यांनी व त्यांचे अधिनस्थ पथक यांनी केली.

Protected Content