पुण्यात निदर्शने तर बारामतीत बंदची हाक

pune 2

 

पुणे प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात ‘ईडी’ने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ बारामती येथे आज (दि.25) बंद पाळण्यात येणार असून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाल्याप्रकरणी देशाचे नेते, माजी कृषिमंत्री शरद पवार; तसेच त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संध्याकाळी ही बातमी धडकताच पुण्यासह बारामतीमध्ये त्याचे पडसाद उमटले. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंडईतील टिळक पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात येणार आहेत, तर बारामतीत बंद पाळण्याचा स्थानिकांनी निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाशी राष्ट्रवादीचा संबंध नाही. हा नागरिकांचा उत्स्फूर्तपणे बंद असेल, असे बारामती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी स्पष्ट केले.

Protected Content