ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच अव्वल : जयंत पाटलांचा दावा

मुंबई प्रतिनिधी । ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याच पक्षाने बाजी मारल्याचे दावे केले जात असतांना आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पक्षाला या निकालातून सर्वाधीक जागा मिळाल्याचा दावा केला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीतील निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले आहेत. त्यात आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही उडी घेतली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, माझ्याकडेही प्रत्येक जिल्ह्याची माहिती आहे. 13, 295 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यात राष्ट्रवादीला 3 हजार 276 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला 2 हजार 406, भाजप 2 हजार 942 आणि काँग्रेसला 1 हजार 938 जागा मिळाल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकावर आणि भाजप तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर असल्याचं पाटील यांन सांगितलं. महाआघाडीने अनेक ठिकाणी एकत्रित मिळून निवडणुका लढवल्या. महाविकास आघाडीचं यश मोठं आहे. त्या तुलनेत भाजप 20 टक्केही नाही, भाजपचं अस्तित्व मर्यादित असल्याचं दिसून आलं आहे.

राज्याचं स्टिअरिंग मुख्यमंत्र्यांच्याच हातात आहे. अनेक अडथळे आहेत. पण त्यांची गाडी व्यवस्थित सुरू आहे, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

Protected Content