कोरोना : जिल्ह्यात आज ३२ बाधित रूग्ण आढळले

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या आजच्या कोरोना अहवालात जिल्ह्यात नवीन ३२ रूग्ण आढळून आले आहे. आज ३४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर दोघाचा मृत्यू झाला आहे. आजच्या आकडेवारीनुसार सात तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-१०, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-५, अमळनेर-१, चोपडा-०, पाचोरा-३, भडगाव-१, धरणगाव-०, यावल-२, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-२, पारोळा-०, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-० आणि बोदवड-४ असे एकुण ३२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकुण ५६ हजार ६९१ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५४ हजार ८४६ रुग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ४९८ रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आज जळगाव शहरातील व धरणगाव येथील प्रत्येकी एक अशा दोन रूग्णाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाने कळविले आहे.

Protected Content