गजानन क्षीरसागर यांना राज्यस्तरीय रुग्णमित्र पुरस्कार जाहीर

 

पाचोरा, प्रतिनिधी ।जळगाव जिल्ह्यातील तरुण समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना शैक्षणिक आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल “राज्यस्तरीय रुग्णमित्र पुरस्कार – २०२१” जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्यातुन पर्यावरण, सामाजआरोग्श निस्वार्थी वृत्तीने सेवा देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील तरुण समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना शैक्षणिक आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल “राज्यस्तरीय रुग्णमित्र पुरस्कार – २०२१” जाहीर करण्यात आला आहे.

त्यांनी आरोग्य सेवा,मनोरुग्ण सेवा, २२० ऑपरेशन मोफत केले आहे. त्यामध्ये डिलिव्हरी, सिजरियन, हाडांचे, जबडा, हरणीया, अपेंडिक्स ऑपरेशन आहेत. वेळोवेळी रक्तदान शिबिर आयोजित करत असतात, त्यामुळे रुग्णांना रक्त पुरवठा करण्यासाठी मोठा दिलासा मिळत आहे. गोरगरीब रुग्णांना मोफत मेडिकल साहित्य पुरवणे व हे कार्य ते निस्वार्थ वृत्तीने करीत आहे या कार्याची दखल घेऊन पर्यावरण मित्र संस्था संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे यांनी निवड केली आहे. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, ट्रॉफी असे आहे .

हा पुरस्कार सोहळा ग्रामपंचायत वराडसीम, ता. भुसावल, जि. जळगाव येथे उद्या दि. २० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. याआधी त्यांना राज्यस्तरीय १४ पुरस्कार व १ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. पर्यावरण मित्र संस्था भारत (पुणे) यांचा हा “रुग्णमित्र पुरस्कार” हा मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Protected Content