दिल्ली जळत असताना, आक्रोश करीत असताना गृहमंत्री कुठं होते : शिवसेना

मुंबई (वृत्तसंस्था) वीर सावरकरांच्या गौरवासाठी जे राजकीय नौटंकी करीत आहेत त्यांनी देशाच्या गौरवाचा विचार करावा. राजधानीतला हिंसेचा धूर देशाला गुदमरून टाकत आहे. त्या धुरात देशाचे गृहमंत्री कुठेच दिसत नाहीत. दिल्ली जळत असताना, आक्रोश करीत असताना गृहमंत्री कुठं होते? असा प्रश्न शिवसेनेने सामना अग्रलेखातून विचारला आहे.

राष्ट्रवादाचा उन्माद आणि धर्मांधतेचा मस्तवालपणा या दोन्ही प्रवृत्ती देशाला तीनशे वर्षे मागे ढकलत आहेत. भडकाऊ भाषणे हेच राजकारणाचे भांडवल झाले आहे. देशाची अर्थव्यवस्था साफ कोसळत आहे, पण भडकाऊ भाषणांचे भांडवल आणि त्यांचा बाजार जोरात आहे. सीएए समर्थक व विरोधकांमध्ये उसळलेली दंगल आता कुठे शमली आहे. मात्र, या दंगलीत ३८ बळी गेले आहेत व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. दिल्ली जळत असताना, आक्रोश करीत असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते? काय करीत होते? असा प्रश्न अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.दिल्लीतील 38 बळी सरकारच्या मानगुटीवर बसवून जाब विचारता आला असता. 38 बळी गेले की जाऊ दिले? तेही प्रे. ट्रम्प यांच्या साक्षीने. हे गौडबंगालच आहे. शाहीन बागचे प्रकरणही सरकारला संपवता आले नाही. तेथे सर्वोच्च न्यायालयाचे मध्यस्थ अपयशी ठरले.

Protected Content