वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन : नगरसेवक डॉ. फेगडे

यावल, प्रतिनिधी । शहरात व परिसरात मागील गेल्या पंधरा दिवसापासून महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे वीज पुरवठा दिवसा आणि रात्री शेकडो वेळा तासंतास खंडीत होत असून हा त्रास बंद होऊन सुरळीत वीजपुरवठा न झाल्यास आंदोलनाचा इशारा नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी महावितरण उप विभागीय कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेनाद्वारे दिला आहे.

 

नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे उपकार्यकारी अभियंता महावितरण यावल विभाग यांना दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की, शहरात वीज पुरवठा खाडीत स्वरूपात व कमी दाबाने होत असून यातून नागरिकांमध्ये नाराजी पसरत आहे. या नाराजीचे रूपांतर मोर्चात झाले असते परंतु, शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू केल्याने नागरिक घराबाहेर पडत नाहीत. जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन त्वरित तोडगा काढण्यात यावा. वीज वितरण कंपनीकडून वीजवापरापेक्षा अधिकचे अव्वाचे सव्वा बिल देण्यात आले आहे. या लॉक डाऊनच्या कालावधीत नागरिकांना हाताला काम नसल्याने उदर्निवाहाचा प्रश्न समोर असतांना अवाजवी बिल कसे भरावे असा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. यावर शासनाने व महावितरण कंपनीने तात्काळ विजधारकांच्या हितासाठी उपाय योजना करावी अन्यथा प्रचंड नाराजीला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी निवेदन देतांना रितेश बारी, स्नेहल फिरके, भूषण फेगडे, मनोज बारी, विजय महाजन, निर्मल चोपडे, उज्वल कानडे, लीलाधर काळे आदी उपस्थित होते.

Protected Content