धरणगाव तालुक्यात पुन्हा ५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह ; आजच्या बाधितांचा आकडा पोहचला २० वर !

 

धरणगाव (प्रतिनिधी) आज दुपारी आलेल्या अहवालानुसार तालुक्यात पुन्हा ५ नवीन कोरोना बाधीत आढळून आल्यामुळे आज (बुधवार) रोजी आढळून आलेल्या बाधितांची संख्या २० वर पोहचली आहे. तत्पूर्वी आज सकाळी तालुक्यात पुन्हा १५ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले होते. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, एकाच दिवसात तब्बल २० कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

बुधवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार तालुक्यात पुन्हा ५ नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवसात तब्बल २० कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यात ३ पाळधी तर एकलग्न येथील २  रुग्णांचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, दुसरीकडे संबंधीत बाधित रूग्णांच्या रहिवासाचा परिसर सील करण्यात येत असून परिसरात लवकरच फवारणी करण्यात येणार आहे. तालुक्यातील आजवर आढळून आलेल्या कोरोना बाधीतांची एकूण संख्या २२२ इतकी झाली आहे. यातील १९ जण मयत झालेत आहेत. तसेच आतापर्यंत १४६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बालकवी ठोंबरे विद्यालय, कोविड सेंटर आणि लिटील ब्लाझम स्कूलमध्ये संशयिताना क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

Protected Content