इंटेलिजन्स फेल्युअर’ची नैतिक जबाबदारी स्वीकारत अमित शहा यांनी राजीनामा द्यावा : सुप्रियाताई सुळे (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । अमेरिकेचे राष्ट्रपती देशात आलेले असतांना अशा पद्धतीने दंगल होणे, हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे. दंगलीच्या काळात गृहमंत्रालय नेमकं काय करत होते? याची चौकशी पंतप्रधान कार्यालयातून झाली पाहिजे. परंतू ‘इंटेलिजन्स फेल्युअर’ची नैतिक जबाबदारी स्वीकारत गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज जळगावात केली.

 

खासदार सुप्रियाताई सुळे या आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शहरातील डॉ. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात ‘उडान नव संजीवनी’चे उद्घाटन सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, खा.सुळे म्हणाल्या की, दंगलीच्या काळात गृहमंत्रालय नेमकं काय करत होते? याची चौकशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पाहिजे. जे दोषी अधिकारी आढळतील, त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. गृहमंत्री मंत्री अमित शाहा यांनी ‘इंटेलिजन्स फेल्युअर’ची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला पाहिजे. मी त्यांच्या जागी राहिले असते, तर निश्चित या गोष्टीचे chintचिंतन केले असते. दरम्यान, राज्यातील सरकार सक्षमपणे काम करत असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील,कुणाल पवार,सलीम इनामदार, रवींद्र पाटील   यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/503006273693648/

Protected Content