चोपडा येथील पंकज विद्यालयात मराठी भाषेचे तालुकास्तरीय प्रशिक्षण

marathi

चोपडा प्रतिनिधी । शालान्त परिक्षेच्या सुधारित मुल्यमापन आराखडा लागू झाला असून शिक्षकांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण घेण्यात येत आहे. (दि.24) रोजी सकाळी ११ वाजता पंकज विद्यालयात मुख्याध्यापक व्ही.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विषयाचे तालूकास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले.

यावेळी तज्ञ मार्गदर्शक म्हणून विलास पाटील (मुख्याध्यापक माध्यमिक विदयालय तांदलवाडी), संजय जोशी (मुख्याध्यापक पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालय वडती), रमाकांत पंडीत (जवाहरलाल नेहरू विदयालय अकूलखेडा), सुनील पाटील (माहिला मंडळ माध्यमिक विदयालय चोपडा), सुधाकर जाधव (माध्यमिक कन्या विद्यालय चोपडा), महेंद्र माळी (प्रताप विदया मंदीर चोपडा) यांनी मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी तज्ञ मार्गदर्शकांचा सत्कार विजया पाटील (पंकज विद्यालय चोपडा) यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एस.जाधव कमळगाव तर राजेश चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.

Protected Content