लासुर येथे अमृतराव वाघ यांचा नागरी सत्कार

lasur

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील लासुर येथील रहिवासी व चोपडा शहर मंडळाधिकारी अमृतराव दत्तात्रय वाघ यांनी नुकतीच स्वेच्छेने सेवा निवृत्ती घेतली. यानिमित्त येथील श्रीक्षेत्र नाटेश्वर मंदिर येथे सर्व संस्था व ग्रामस्थ आणि मित्र परिवाराचा वतीने त्यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी लासुर वि.का. सोसायटीचे चेअरमन ए.डी.माळी हे होते. यावेळी अमृतराव वाघ यांचा सत्कार येथील रहिवासी व शिरपूर येथे कार्यरत असलेले उद्योगपती रमेशशेठ जैन (इंदरचंद देवचंद जैन) यांचे हस्ते करण्यात आला.

वाघ यांनी सांगितले अनुभव
यावेळी अमृतराव वाघ यांनी सांगितले की, मी १९८५ साली वयाचा १९ व्या वर्षी नोकरीस सुरुवात करीत असतांना व घरची परिस्थिती बिकट साधे कपडे घ्यायला सुद्धा पैसे नव्हते त्यामुळे मी ही गरिबी अनुभवली आहे. त्यासाठी माझ्या नोकरीचा कालावधीत मी गरिबांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न केला. याचबरोबर, र.सु.माळी, कैलास बाविस्कर, विक्रम जावरे, अजय पालीवाल, कैलास बाविस्कर, ए.डी.माळी, हिसाळे येथील नागरिक खंडेराव गुरुजी, रमेश.जे.पाटील, राजाराम पाटील, उपेंद्र पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
हा कार्यक्रम ग्रामपंचायत कमिटी लासुर, तंटामुक्ती समिती लासुर, लासुर वि.का.सोसायटी, नाटेश्वर पीक संरक्षण सोसायटी, कि.शि.वि.प्रसारक मंडळ लासुर, जलसंधारण मंच लासुर, यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे सुत्र
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए.के.गंभीर यांनी केले. तर सुत्रसंचलन उपसरपंच अनिल वाघ यांनी केले तर आभार जितेंद्र माळी यांनी मानले. यावेळी सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मित्र परिवार तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content