मोदींना टोला मारण्यास गेलेले थरुर स्वतःच अडकले

pm modi tharoor

तिरुअनंतपुरम वृत्तसंस्था । काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे त्यांच्या ट्विटमुळे नेहमची चर्चेत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातील ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमाची चेष्टा करताना थरूर यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख ‘इंडिया गांधी’ असा करून सोशल मीडियावर हलकल्लोळ उडवून दिला. थरुर अनेक वेळा सोशल मीडियावर दुसऱ्यांच्या चुका सांगत असतात. स्वत:च त्यात अडकल्यामुळे चांगलेच ट्रोल होत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, थरूर यांनी सोमवारी ‘ट्विटर’वर दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे एक छायाचित्र शेअर केले. ‘नेहरू आणि इंडिया गांधी हे १९५४मध्ये अमेरिका दौऱ्यावर असताना…उत्साहाने आणि मोठ्या संख्येने जमलेला जनसमुदाय पहा. कोणतीही प्रसिद्धी मोहीम नाही आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी खास व्यवस्था नाही. तरीही स्वयंस्फूर्तीने आलेले हजारो अमेरिकी नागरिक पहा…’ असा उल्लेख छायाचित्रांच्या ओळीमध्ये होता. त्या ओळींमध्ये इंदिरा गांधी यांच्याऐवजी इंडिया गांधी असे लिहिले गेले आणि ट्विटर यूजर भडकले. त्यांनी थरूर यांच्या जोरदार ट्रोल केले आणि जबरदस्त टीका केली. अर्थात, थरूर यांनी ही चूक मुद्दाम केली, की ती ‘टायपिंग मिस्टेक’ होती, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, मोदी यांची थट्टा करायला गेलेल्या थरूर यांचीच सोशल मीडियावर या निमित्ताने थट्टा उडविण्यात आली. तसेच थरूर यांनी केले ट्विट दीड हजार वेळा ‘रिट्वीट’ करण्यात आले, तर 11 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. मात्र, सर्वाधिक चर्चा झाली ती त्याच्यावर झालेल्या टीकेची आणि ट्रोलिंगची. अर्थात, नंतर ट्विटरवर #इंडियागांधी हा नवा हॅशटॅग पॉप्युलर झाला आणि चर्चेत बनला असून सोशल मीडियावर चांगलाच हलकल्लोळ उडाला आहे.

Protected Content