नारायण राणेंचे मंत्रीपद निश्‍चीत; दिल्लीत बोलावले !

मुंबई प्रतिनिधी | माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना होऊ घातलेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात स्थान मिळणार असल्याचे निश्‍चीत झाले असून त्यांना आज दिल्लीत तातडीने बोलवण्यात आले आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना दिल्लीहून तातडीचं बोलावणे आले आहे. राणे आज दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. यामुळे त्यांची केंद्रीं मत्रीमंडळाच्या विस्तारात वर्णी लागणार असल्याचे फिक्स झाल्याचे मानले जात आहे. महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेला सातत्यानं अंगावर घेण्याचं काम राणेंनी केलं आहे. त्याच कामाची पावती म्हणून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राणे यांच्यासोबत रणजीत नाईक निंबाळकर आणि हिना गावित यांच्या नावांचीदेखील मंत्रिपदासाठी चर्चा आहे. यापैकी हीना गावित यांना राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजपसह अन्य सहयोगी पक्षातील १७ ते २० राज्यसभा आणि लोकसभा खासदार संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचं नाव केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुरुवातीपासूनच चर्चेत होतं. दिल्लीत राणेंची जे पी नड्डा यांच्याशी भेट झाल्यानंतर यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Protected Content