मुंबई-पुण्यासह राज्यात मुसळधार पाऊस

0Rain 1

 

मुंबई (वृत्तसंस्था) काही काळ विश्रांती घेतल्यानंतर परतीच्या पावसाने मुंबई शहर, उपनगरांसह पुण्याला झोडपून काढले आहे.

पुण्यात मंगळवारी रात्रीपासून तर मुंबई शहर परिसरात सकाळी चार वाजेपासून पावसाचा जोर वाढला. विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळत असून, ठाणे, भिवंडी, कल्याण, डोबिंवलीत मुसळधार पाऊस सुरू आहे. तर नाशिक, लातूर, बीड, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. दरम्यान, पावसामुळे विटा-कराड महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुंबईच्या विविध भागांत रात्रभर पाऊस पडत आहे. पहाटे पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. दक्षिण मुंबईसह उपनगरातही सर्वदूर पाऊस कोसळत आहे.
पुणे शहरात मंगळवारी रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे शहर परिसरात गेल्या 12 तासांत चोवीस ठिकाणी रस्ते, पार्किंग व घरांत पाणी शिरले तर तेरा ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडल्या. अशा एकूण 37 घटनांची अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे नोंद करण्यात आली आहे.

Protected Content