पंतप्रधान मोदींसह डोवाल यांच्यावर हल्ल्याचा कट; गुप्तचर यंत्रणांकडून सतर्कतेचे आदेश

narendra modi ajit doval pti 201906246578

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्याच्या बदला घेण्यासाठी जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला असून त्यासाठी विशेष तुकडी तयार केली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षासल्लागार अजित डोवाल यांच्यावर हल्ले करण्याचा कट ‘जैश’ आखत आहे. यासाठी विशेष दहशतवाद्यांचे पथक तयार करत असल्याचे गुप्तचर विभागाने म्हटले आहे. कलम 370 हटवल्यानंतरचा बदला घेण्यासाठी जैशकडून अशा पद्धतीचा कट आखला जात आहे. विशेोष म्हणजे पाकिस्तानची गु्प्तचर यंत्रणा आयएसआयमधील एक मेजर या हल्ल्यासाठी जैशच्या दहशतवाद्यांना मदत करत आहे. यासंदर्भात गु्प्तचर यंत्रणेला पाकिस्तानी दहशतवादी शमशेर वाणी आणि त्याच्या कमांडर सोबत झालेल्या चर्चेचा तपशील मिळाला आहे.

 

मिळालेल्या माहितीच्या आधारे जम्मू, अमृतसर, पठाणकोट, जयपूर, कानपूर, गांधीनगर, लखनऊसह एकूण ३० शहरांमध्ये पोलिसांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवल यांच्याही सुरक्षेचा आढावा घेतला आहे. सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोट एअर स्ट्राइकच्या योजनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळेच ते पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत.

Protected Content