नशिराबाद येथे लहान मुलाच्या भांडणावरून दोन गटात हाणामारी, दगडफेक; ११ जण जखमी, १६ जणांविरूध्द गुन्हा

 

जळगाव : प्रतिनिधी । लहान मुलाच्या भांडणावरून नशिराबाद येथे दोन गटात हाणामारी शुक्रवारी दुपारी झाली. यात ११ जण जखमी झाले  आज शनिवारी सकाळी दोन गटातील परस्परविरोधातील गुन्ह्यांमध्ये एकुण १६ जणांविरूध्द नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आशिफ पिंजारी (वय-३३ रा. इस्लामपूरा नशिराबाद)  यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी  दुपारी गावातील पिंजारी मोहल्ल्यात लहान मुलाशी झालेल्या भांडणाच्या कारणावरून महेमुद पिंजारी (वय-४०), फिरोज पिंजारी (वय-३५), जावेद पिंजारी (वय-३५), गफ्फार पिंजारी (वय-३५), अज्जू पिंजारी (वय-२५), साहिल पिंजारी (वय-१९), अजिज पिंजारी (वय-४५), फिरोज पिंजारी (वय-३०), अब्दूल पिंजारी (वय-५९), आशिफ पिंजारी (वय-३२), जुगनीबी पिंजारी (वय-३६) आणि सलमाबी पिंजारी (सर्व रा. पिंजारी मोहल्ला)  यांनी बेकायादेशीर गर्दी करून आशिफ पिंजारीसह त्यांचा मामा व मामे भाऊ यांना लाठ्या काठ्याने बेदम मारहाण केली आहे. यात पाच जण जखमी झाले आहे.

 

दुसऱ्या गटातील फिरोज पिंजारी (वय-३८ रा. पिंजार मोहल्ला)  याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गल्लीत खेळणाऱ्या लहान मुलाच्या भांडणाच्या कारणावरून आशीफ  पिंजारी (वय-३५) याने त्याचे मामा आरिफ पिंजारी (वय-४५), शकील पिंजारी आणि अन्य एकजण यांनी घरातून लाकडी दांडा, लोखंडी सळई आणि दगडविटा यांचा वापर करून फिरोज यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांवर दगडफेक केली. आशीफ पिंजारी याने लोखंडी सळई आणि लाकडी दांड्याने महेमुद पिंजारी आणि करीम पिंजारी यांना मारहाण केली. दोन्ही गटातील १२ जण जखमी झालेत. जखमींना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

नशिराबाद पोलीस ठाण्यात शनिवारी सकाळी परस्पविरूध्द १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स पो नि गणेश चव्हाण करीत आहे.

 

Protected Content