टाकळी येथे जुगार अड्ड्यावर छापा: लाखांचा मुद्देमाल जप्त!

मेहूनबारे प्रतिनिधी । तालुक्यातील टाकळी शिवारातील अण्णपूर्णा हॉटेल जवळ अवैध्यरित्या पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पथकाने विविध तीन ठिकाणी छापा टाकून १ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त करून एकूण १८ जणांवर कारवाई केली आहे.       

याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय तृतीया या दिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील टाकळी शिवारातील अण्णपूर्णा हाॅटेल जवळ, अण्णपूर्णा हाॅटेल पाठीमागे निंबू बागेत व अण्णपूर्णा हाॅटेल पाठीमागील निंबू बागेजवळ अशा तीन ठिकाणी अवैध्यरित्या पत्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून कळताच पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून १,९४०००‌ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे. वरील अण्णपूर्णा हाॅटेल जवळून ७० हजार, अण्णपूर्णा हाॅटेल पाठीमागे निंबू बागेतून ५३५०० रूपये व अण्णपूर्णा हाॅटेल पाठीमागील निंबू बागेजवळून ७०५०० रूपये  असे एकूण १ लाख ९४ हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. हि कारवाई पोलिसांच्या पथकाने अनुक्रमे रात्री २:०५ वाजता, रात्री १:५५ वाजता व रात्री २ वाजता यावेळी छापा टाकण्यात आला.

यावेळी एकूण १८ जणांवर कारवाई करण्यात आली. अण्णपूर्णा हाॅटेल जवळ जुगार खेळताना अनिकेत कैलास पाटील, ऋषीकेश संजय मिस्तरी,  संदीप गडबड पाटील, गोकुळ कौटीक चौधरी व सुनील सुरेश मगर सर्व रा‌. टाकळी व प्रकाश तिरमली रा. चिंचखेडा आदी तर अण्णपूर्णा हाॅटेल पाठीमागे निंबू बागेत जुगार खेळताना संदिप शिवाजी गोपाळ रा. चितखेडे, गुलाब पोपट चव्हाण रा. शिंदी, योगेश पाटील रा. अंधारी, राणा राजाराम रा. टाकळी, प्रभाकर दौलत पाटील रा. बिलाखेड व एकनाथ मोरे पाटील रा. तळोंदे व निंबू बागेजवळ अशोक सुरेश देशमुख रा. पिंपळवाड, हिरामण दादा पाटील रा. पिलखोड , राजु दत्तू शिंदे रा. टाकळी, नामदेव सुरेश पाटील रा. तमगव्हान , सोमनाथ रामभाऊ झेंडे रा. पिलखोड व रामलाल गणेश बारेला रा. मेंढगाव आदी मिळून आले. या १८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

हि कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावंडे व पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. याप्रकरणी पोलिस कर्मचारी सुभाष गोकुळ पाटील, अनवर कलंडर तळवी व पोकॉ दिपक शांताराम नरवाडे यांच्या फिर्यादीवरून मेहूनबारे पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

 

 

Protected Content