रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीतून ४४ लाखांची लूट

crime bedya

 

मुंबई प्रतिनिधी । येथील रेल्वे स्थानकाच्या तिकीटविक्री खिडकीतून ४४ लाख रुपयांच्या रोख रकमेवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी डल्ला मारला असून आरोपींना रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, समीर ताहराबादकर आणि कुमार पिल्ले अशी या दोघांची नावे आहेत. यापैकी समीर हा कॅशिअर आणि कुमार हा मुख्य बुकिंग क्लार्क म्हणून लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये काम करत होते. तिकीटविक्रीतून आलेली रोख रक्कम ठेवण्यात येणाऱ्या कक्षात कॅशिअर आणि बुकिंग क्लार्क वगळता अन्य कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही. टर्मिनसमध्ये ४४ लाखांची चोरी झाल्याबाबत कॅशिअर समीर ताहराबादकर यांनी माहिती दिली नव्हती, असा जबाब मुख्य तिकीट निरीक्षक सुनील तेलतुंबडे यांनी दिला होता. या जबाबानंतर रेल्वे पोलिसांनी समीर ताहराबादकरची चौकशी करण्यास सुरुवात केली. ताहराबादकर आणि बुकिंग क्लार्क कुमार पिल्ले यांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून आरोपींना २८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Protected Content