साई मंदिरात शेड बांधण्यासाठी पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील वनोली येथील तिर्थक्षेत्र म्हणुन प्रसिद्ध असलेले श्रीसाईबाबा मंदिर परिसरात भाविकांची गैरसोय टाळता यावी, यासाठी शेड उभारणीस निधी मिळावा, अशी मागणी हिरालाल व्यंकट चौधरी ट्रस्ट अध्यक्ष यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा आणी स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.

त्यांनी मंदीर विश्वसतांच्या शब्दाला मान देवुन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तातडीने मागवीला ग्रामपंचायतीचे सरपंच हिरालाल चौधरी यांचे चिरंजीव प्रकाश हिरालाल चौधरी यांनी हा प्रस्ताव फैजपुर चे माजी नगराध्यक्ष पिंटु राणे यांच्यासमवेत सादर केला असुन , सप्टेंबरच्या शेवटच्या त्यात व आक्टोबर च्या पहिल्या हप्त्यात श्री साईबाबा महाराजांची दसऱ्याच्या अष्टमीला व नववीला मोठा भंडारा या ठिकाणी होतो.

 देशभरातून भाविक चाळीस ते पन्नास हजाराच्या वर हजेरी लावतात पावसाळ्याचे शेवटचे चरण असल्याने अकाली येणाऱ्या पावसामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते व गाव हे छोटे असल्याने या ठीकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना व या ठीकाणी वास्तव्यास राहणाऱ्या ग्रामस्थांच्या नातेवाइकांची ही मोठी गर्दी या ठीकाणी होते, असा प्रसंगी भाविक म्हणुन येणाऱ्यांना सामावून घेणे जड जाते त्यासाठी मंदीर परिसरात असलेल्या प्रांगणात मोठे पत्री शेड उभारणीसाठी व गावोगावचे आलेल्या भाविकांनाची गैरसोय टाळता यावी, म्हणून या शेड उभारणीस पन्नास लाख रुपये निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती श्रीसाईबाबा संस्थानचे ट्रस्टी हिरालाल व्यंकट चौधरी व ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश चौधरी व त्यांचे सर्व ग्रामपंचायतीचे सहकारी सदस्य यांनी ठराव घेऊन प्रस्ताव सादर केला असुन आपल्या प्रस्तावावर सहानुभूतीपूर्वक विचार करून निश्चितच मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी वनोली सरपंच प्रकाश हिरालाल चौधरी व पिंटू राणे यांना आश्वासित केले आहे. .

 

Protected Content