जामनेर आयटीआयजवळ अपघात; एक ठार

जामनेर प्रतिनिधी । जामनेर- जळगाव रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ ट्रक व रिक्षाची धडक झाल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर शहरात कटुरले विकुन रिक्षाने घरी जाणाऱ्या व्यक्तीचा अपघातात मृत्यु झाल्याची घटना रात्री आठ वाजेदरम्यान घडली. ही घटना जामनेर- जळगाव रस्त्यावर औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ ट्रकवर रिक्षाची धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. यात पळासखेडा येथील मोलमजुरी करणारे संतोष भिल हे आपला उदरनिर्वाह म्हणून पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या कटुरले विकुन गावातीलच वराडे नामक रिक्षाचालकाच्या रिक्षात घरी जायला निघाले, परंतु रस्त्यातच रिक्षाचा ट्रकवर धडकुन अपघात झाला त्यात एक जण ठार झाल्याची माहिती घटनास्थळी मिळाली. गाडी चालक हा जामनेर पोलीस स्टेशनला जमा झाला असुन गाडी नरडाणा येथील असल्याचे समजते.

 

Protected Content