पाचोरा काँग्रेस कमिटीतर्फे लता मंगेशकर यांना आदरांजली

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा काँग्रेस कमिटीतर्फे शहरातील राजे संभाजी महाराज चौकात गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

गानसम्राज्ञी भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांचे दि. ६ फेब्रुवारी रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. स्व. लता मंगेशकर यांच्या जाण्याने संगितातील एक पर्व संपले असुन त्यांचे स्वर अजरामर राहावेत, या उद्देशाने व अश्रुनयनांनी दि. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ वाजता शहरातील राजे संभाजी महाराज चौकात पाचोरा काँग्रेस कमिटी तर्फे येथील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहराध्यक्ष अॅड. अमजद पठाण, राहुल शिंदे यांचेसह स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे स्व. लता दिदींना दिपप्रज्वलन करून पुष्पांजली अर्पण करून भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी स्व. लता दिदींच्या सुमधुर आवाजाच्या गीतांनी परिसर मंत्रमुग्ध झाला होता.

 

 

Protected Content