निवड सूचीतील कला पथकांना कार्यक्रम द्या : शिष्टमंडळाची मागणी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातील कला पथकांच्या शिष्टमंडळाने जिल्ह्यातील कलावंतांना कामे मिळावी अश्या मागणी  जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

निवेदनाचा आशय असा की, १४ ऑक्टोबर च्या शासन निर्णयानुसार आपल्या जिल्ह्यात दहा संस्थांची कलापथकांची निवड करण्यात आली पण अद्याप पर्यंत कार्यक्रम मिळाले नाही. कोविड -१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून कलावंतांचे कामच बंद असल्याने काही कला पथकांच्या कलाकारांवर उपासमारी व मोलमजुरी करण्याची वेळ आलेली असल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यथा मांडली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्वरीत कार्यक्रम देऊ असे कलावंतांना आश्वासनही दिले आहे.आज जे कलावंत आपल्या उदरनिर्वाहासाठी कलेवर अवलंबून आहेत असे कलाकारांबद्दल मला सहानुभूती आहे असेही जिल्हाधिकारी मत व्यक्त केले. निवेदन देताना समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे विशाल जाधव, तुळजाई बहुउद्देशीय संस्थेचे भूषण लाडवंजारी, संवेदना बहुउद्देशीय संस्थेचे दीपक पाटील, बबन जोगी, बापू जोगी, अशोक जोगी( शिवकालीन कला जोपासणारे गोंधळी ),स्वप्नरंग बहुउद्देशीय संस्थेचे महेश राठी, जयंत चव्हाण आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/225993226305393

Protected Content