पुरातत्व विभागच्या ना हरकत प्रमाणपत्राची दीड लाखची मागणी; संचालकासह सहाय्यक ही एसीबीच्या ताब्यात

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिकमध्ये लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केली आहे. रामशेज किल्ल्याजवळ कंपनी सुरू करण्यासाठी पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्राच्या बदल्यात विभागाच्या सहाय्यक संचालक आरती आळे यांनी दीड लाखाची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने त्यांना अटक केली आहे.

गुजरातमधील मूळचे रहिवासी असलेले व सध्या नाशिकमध्ये राहणाऱ्या एका उद्योजकाने रामशेज किल्ल्याच्या परिसरात ऑइल कंपनीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी पुरातत्त्व खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र देण्यासाठी दीड लाखाची लाच मागण्यात आली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाच रक्कम त्यांनी पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांच्या नावाने स्वीकारल्याने या दोघांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. लाचेचा सापळा समजताच गर्गे फरार झाले असून एसीबीचे पथक त्यांच्या मागावर आहे.

Protected Content