जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ रॅली

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मैदानात उतरले असून स्वतः जामनेर तालुक्यात ठिकाणी गावागावांमध्ये जाऊन प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत आहे. रक्षा खडसे यांचा जामनेर प्रचार दौऱ्यादरम्यान जामनेर शहरांमध्ये भव्य अशी प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती.
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नवल पाटील, माजी जि. प. अध्यक्ष दिलीप खोडपे, संजय गरुड, विलास राजपूत, शरद पाटील, मार्केट कमिटी सभापती राजमल भागवत, शेतकरी संघ संचालक रमेश नाईक, अमर पाटील, डॉ. प्रशांत भोडे, अतिश झाल्टे, रवींद्र झाल्टे, कैलास पालवे, भाईदास चव्हाण, बाबुराव हिवराळे यांच्यासह भाजपा व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते. प्रचार दौऱ्यादरम्यान जामनेर तालुक्यातील हिवरखेडा, पळासखेडा, नेरी गाडेगाव, चिंचखेडा, पळासखेडा, मिराचे केकट, निंभोरा, मोहाडी, देवपिंपरी, भराडी, नाचनखेडा, शेंदुर्णी, कळमसरा या गावांमध्ये प्रचार दौरा होणार असून यामध्ये प्रचंड अशी मतदाराची गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे मोठ्या उत्साहात रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवाराला जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Protected Content