प्रसिध्द दिग्दर्शक संगीत सिवन याचे निधन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रसिध्द दिग्दर्शक आणि पटकथा लेखक संगीत सिवन यांचे निधन झाले आहे. ते ६५ वर्षांचे होते. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना संगीत सिवन यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे निधन कसे झाले, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

अपना सपना मनी-मनी, जोर, क्या कूल हैं हम आणि यमला पगला दीवाना-२ यासरखे प्रसिद्ध चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. संगीत सिवन मल्याळम चित्रपट उदयोगातील प्रसिध्द चेहरा होते. त्यांनी प्रसिध्द मल्याळम अभिनेता मोहनलाल यांच्या योध्दा, गंधर्वम आणि निर्णयम या चित्रपटात दिग्दर्शन म्हणून काम केले होते. ते १९९० पासून मल्याळम चित्रपट उदयोगात कार्यरत होते.

Protected Content