फडणविसांच्या विरोधात अनिल गोटे यांची ईडीकडे तक्रार !

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | इक्बाल मिर्ची या कुख्यात गुंडाकडून देणगी स्वीकारल्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी धुळे येथील माजी आमदार अनिल गोटे यांनी ईडीकडे तक्रार नोंदविली आहे.

महाविकास आघाडीतील काही नेत्यांवर तपास यंत्रणांनी कारवाई केली. ईडीने नुकतीच नवाब मलिकांना अटक केली. त्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. संजय राऊतांनी देखील काही पुराव्यांसह पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारला दाऊद संबंधित कंपनीकडून देणगी मिळाल्याचा आरोप केला आहे.

 

’’कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात असलेला देशद्रोही व १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी इक्बाल मिरची आहे. त्याच्या संबंधित असलेल्या राकेश वाधवान यांच्या बँक खात्यातून फडणवीस सरकारला २०१४ ते १५ मध्ये १० कोटी रुपये देणगी देण्यात आली होती. राकेश वाधवान पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून सध्या तुरुंगात आहे’’, असे आरोप अनिल गोटे यांनी केले आहे. खंडणी गोळा केल्याप्रकरणी अनिल गोटे यांनी मुंबईतील ईडी कार्यालयात तक्रार नोंदवल्याची माहिती आहे. याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच देवेंद्र फडणवीसांची चौकशी करण्याची मागणी गोटेंनी केली आहे.

Protected Content