राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त पुतळ्याला माल्यार्पण (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील गांधी उद्यानात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

याबाबत माहिती अशी की, शहरातील महात्मा गांधी उद्यानात रविवारी ३० जानेवारी रोजी राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा दिवस असल्यामुळे भारत देश या वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. देशाच्या स्वातंत्र्य मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे योगदान अमूल्य असून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने हिंसाचार वृत्तीचा निषेध करीत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा दिवस म्हणून जळगाव जिल्हा राष्ट्रवादी व जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्याहस्ते हार व पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला. याप्रसंगी माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटिल, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी, योगेश देसले, वाल्मिक पाटिल, अशोक पाटील, सुनील माळी, अमोल कोल्हे, कल्पिता पाटील, दिलीप माहेश्वरी, मजहर पठाण, सुशील शिंदे, अकिल पटेल, रिजवान खाटिक, रहीम तडवी, राजू बाविस्कर, राहुल टोके यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/480204423613083

 

Protected Content