चलनी नोटांवर हव्यात लक्ष्मी व श्रीगणेशाच्या प्रतिमा ! : केजरीवाल

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर महात्मा गांधीजी यांच्या सोबत लक्ष्मी देवी आणि श्रीगणेशाच्याही प्रतिमा असाव्यात अशी मागणी केली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केंद्र सरकारकडे एक खास मागणी केली आहे. ते म्हणाले की, देशातील प्रत्येक नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा असते. याच्याच जोडीाला आता लक्ष्मी देवी आणि श्रीगणेशाच्या प्रतिमा देखील प्रत्येक चलनी नोटेवर असाव्यात. याबाबत केंद्र सरकारने पाठपुरावा करून प्रतिमा छापण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या संदर्भात केजरीवाल म्हणाले की, इंडोनेशिया सारख्या मुस्लीम राष्ट्रातील चलनी नोटांवर देखील श्रीगणेशाचे चित्र आहे. यामुळे आपल्या देशात असे करण्यास काहीही हरकत नाही. लक्ष्मी आणि श्रीगणेशाचे चित्र नोटांवर छापले तर देशात समृध्दी आणि सुबत्ता येणार असल्याचा दावा देखील अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

दरम्यान, आगामी काळात गुजरात आणि हिमाचल प्रदेशासोबत विविध राज्यांच्या विधानसभा होत आहेत. या पार्श्‍वभूमिवर अरविंद केजरीवाल यांनी आपल्या आम आदमी पक्षासाठी हिंदू कार्ड खेळल्याचे यातून मानले जात आहे. तर, या मागणीवर अद्याप तरी केंद्र सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Protected Content