मुलाचा सांभाळ करण्याचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

पिंपरी (वृत्तसंस्था) तुझ्या मुलाचा सांभाळ करेन असे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करून गर्भपात करायला लावल्याप्रकरणी एका तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किवित अशोक पाटील (वय ३०, रा. सूसगाव, ता. मुळशी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पीडित महिला आणि आरोपी हे दोघे एकाच कंपनीत कामाला असून ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी याने महिलेशी मैत्री करून तिला लग्नाचे आमिष दिले. महिलेच्या मुलाला सांभाळतो, असे सांगून आरोपीने स्वत:च्या घरी व महिलेच्या घरी महिलेवर बावधन व सूसगाव, बाणेर येथे २८ फेब्रुवारी २०१९ ते २ जुलै २०२० दरम्यान लैंगिक अत्याचार केले. यात महिला गरोदर राहिली. त्यांनी एका खासगी रुग्णालयात गर्भपात केला. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपी याला अटक केली आहे.

Protected Content