मल्लीकार्जुन खर्गे यांनी स्वीकारला कॉंग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मल्लीकार्जुन खर्गे यांनी आज कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली आहेत.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांनी आज आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. कॉंग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांनी मल्लिकार्जून खरगे यांना निवडणूक प्रमाणपत्र दिले. यावेळी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही उपस्थित होत्या.

कॉंग्रेस अध्यक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर भाषण करताना हा क्षण भावूक असल्याची भावना मल्लिकार्जून खरगे यांनी व्यक्त केली. तसेच एका सामान्य कुटुंबातील मुलाला कॉंग्रेस अध्यक्ष होण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे, असेही ते म्हणाले. पदभार स्वीकारल्यानंतर कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही खरगे यांना शुभेच्छा दिल्या. मी खरगे यांचे मनापासून अभिनंदन करते. ते एक अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभावचा कॉंग्रेस पक्षाला नक्कीच फायदा होईल. कार्यकर्त्यापासून ते अध्यक्षपदाचा प्रवास त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर पूर्व केला आहे. मी पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Protected Content