पंतप्रधान स्वनिधी आत्मनिर्भर योजना लाभासाठी जी एम फाउंडेशनचा पुढाकार

जळगाव, प्रतिनिधी । पंतप्रधान स्वनिधी आत्मनिर्भर योजना लाभासाठी जी. एम. फाउंडेशनचा पुढाकार घेतला असून सोमवार दि. १० ऑगस्टपासून सकाळी ११ ते संध्या ६ या वेळेत जी. एम. फाऊंडेशन येथे ऑनलाइन नोंदणीस सुरुवात करण्यात आलेली आहे.

कोरोना साथीच्या संकटात लॉकडाऊनच्या प्रदीर्घ कालावधीमुळे हानी झाल्याने पंतप्रधान स्वनिधी आत्मनिर्भर योजने अंतर्गत २४ मार्च पर्यंत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत पथविक्रेत्यांना एक वर्ष परतफेडी मुदतीसाठी १०,०००/- रुपयां पर्यंत कर्ज दिले जाणार आहे. यासाठी बँकांचे प्रचलित व्याजदर लागू असणार आहे. नियमित परत फेड करणाऱ्या पथविक्रेत्यास ७% व्याजदर सबसिडी म्हणून दिले जाईल आणि त्रैमासिक पद्धतीने ते पथविक्रेत्याच्या खात्यात जमा केले जातील. डिजिटल पेमेंट सुविधा वापरणाऱ्या पथविक्रेत्यास दरमहा आकर्षक कैशबेक हि दिला जाणार आहे.

कोविड -१९ च्या काळात आप-आपल्या घरी परतलेल्या पथविक्रेत्यांना सुद्धा सदर योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. या योजनेचा लाभ शहरातील पथविक्रेत्यांना घेता यावा म्हणून जी. एम . फाऊंडेशन मदत करीत आहे. विनामूल्य ऑनलाईन अर्ज भरण्यापासून ते योजनेचा लाभ मिळेपर्यत सहकार्य केले जात आहे.

सोमवार दि. १० ऑगस्टपासून सकाळी ११ ते संध्या ६ या वेळेत ऑनलाइन नोंदणीस सुरुवात करण्यात आलेली आहे. पथविक्रेत्यांचे विनामूल्य अर्ज जी. एम. फाउंडेशन, शिवतीर्थ (जी. एस. ग्रॉउंड) समोर, या ठिकाणी भरून दिले जात आहे. याचा लाभ पथविक्रेते यांनी घ्यावा असे आवाहन जी. एम. फाउंडेशनतर्फे करण्यात आलेले आहे. यशस्वीतेसाठी दिनेश हिंगणे, मोहन तिवारी, रवींद्र सैंदाणे, बाळू बाविस्कर, सुनील सोनार, राजू चौधरी, मुसाभाई बागवान, सुनील जाधव, रवींद्र महाजन, प्रभाकर तायडे, नंदू पाटील, अशपाक बागवान, राजेंद्र वाणी, विजय शिंपी, रियाज बागवान, चेतन काळे, अजय चौधरी, विशाल पाटील आदी परिश्रम घेत आहे. योजनेसाठी लागणारी कागदपत्र व अधिक माहितीसाठी ७०२००१८०८९ या क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली आहे.

Protected Content